स्वित्झर्लंड

Context of स्वित्झर्लंड


स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी - म्हणजे राज्यांनी - बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.

पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय सं...अधिक वाचा


स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी - म्हणजे राज्यांनी - बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.

पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम येथेच झाला.

Where can you sleep near स्वित्झर्लंड ?

Booking.com
2 visits today, 315 Destinations, 6.650 Points of interest, 221.751 visits in total.