शांघाय

Context of शांघाय


षांघाय, रूढ लेखन शांघाय, (अन्य लेखनभेद: षांगहाय, शांगहाय, शंघाई, शांघाई ; सोपी चिनी लिपी: 上海; पिनयिन: Shànghǎi; उच्चार: शांग-हाऽ-इ; (अर्थ: समुद्रकिनाऱ्यावरचे); वू: Zånhae; आयपीए: [zɑ̃'he]), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत्रांपैकी एक असलेल्या शांघाय महानगराची लोकसंख्या इ.स. २०१० सालच्या जनगणनेनुसार २ कोटी ३० लाख एवढी आहे. हे जगातले एक प्रमुख वित्तीय केंद्र असून मालाच्या आवकजावकीनुसार जगातील सर्वाधिक वाहतुकीचे बंदर आहे.

चिनाच्या पूर्व किनारपट्टीवरचे शांघाय यांगत्से नदीच्या मुखापाशी वसले आहे. शांघाय महानगर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा च्यांग्सू आणि च-च्यांग या प्रांतांना भिडल्या असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

Where can you sleep near शांघाय ?

Booking.com
30 visits today, 312 Destinations, 6.532 Points of interest, 219.045 visits in total.