David (Michelangelo)
( डेव्हिड (मिकेलेंजेलो) )डेव्हिड हा इटालियन कलाकार मिकेलेंजेलोने इ.स. १५०१ आणि १५०४ दरम्यान पुनर्जागरण काळातील- संगमरवरी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. डेव्हिड हा ५.१७-मीटर (१७ फूट ० इंच) बायबलसंबंधी पात्र आहे जो फ्लॉरेन्सच्या कलेतील एक आवडता विषय.
१६ ऑगस्ट १५०१ रोजी, मिकेलेंजेलोला हे आव्हानात्मक नवीन कार्य करण्यासाठी अधिकृत कंत्राट देण्यात आले. त्याला कंत्राट मिळाल्याच्या एका महिन्यानंतर १३ सप्टेंबर रोजी सकाळी त्याने पुतळा कोरण्यास सुरुवात केली. दोन वर्षांहून अधिक काळ ते भव्य पुतळ्यावर काम करणार होते.
जून १५०४ मध्ये, डेव्हिड हा पॅलाझो वेचियोच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापित करण्यात आला, जेथे आधी डोनाटेलोच्या <i id="mwaQ">जुडिथ आणि होलोफर्नेसच्या</i> कांस्य शिल्प होते. मिकेलेंजेलोच्या कार्यशाळेपासून अर्ध्या मैल अंतरावर असलेला पुतळा हलवायला चार दिवस लागले.
१८७३ मध्ये, नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठीडेव्हिडचा पुतळा पियाझातून काढून टाकण्यात आला, आणि अकादमीया गॅलरी, फ्लॉरेन्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. १९१० मध्ये पियाझा डेला सिग्नोरियामध्ये एक प्...अधिक वाचा
डेव्हिड हा इटालियन कलाकार मिकेलेंजेलोने इ.स. १५०१ आणि १५०४ दरम्यान पुनर्जागरण काळातील- संगमरवरी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. डेव्हिड हा ५.१७-मीटर (१७ फूट ० इंच) बायबलसंबंधी पात्र आहे जो फ्लॉरेन्सच्या कलेतील एक आवडता विषय.
१६ ऑगस्ट १५०१ रोजी, मिकेलेंजेलोला हे आव्हानात्मक नवीन कार्य करण्यासाठी अधिकृत कंत्राट देण्यात आले. त्याला कंत्राट मिळाल्याच्या एका महिन्यानंतर १३ सप्टेंबर रोजी सकाळी त्याने पुतळा कोरण्यास सुरुवात केली. दोन वर्षांहून अधिक काळ ते भव्य पुतळ्यावर काम करणार होते.
जून १५०४ मध्ये, डेव्हिड हा पॅलाझो वेचियोच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापित करण्यात आला, जेथे आधी डोनाटेलोच्या <i id="mwaQ">जुडिथ आणि होलोफर्नेसच्या</i> कांस्य शिल्प होते. मिकेलेंजेलोच्या कार्यशाळेपासून अर्ध्या मैल अंतरावर असलेला पुतळा हलवायला चार दिवस लागले.
१८७३ मध्ये, नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठीडेव्हिडचा पुतळा पियाझातून काढून टाकण्यात आला, आणि अकादमीया गॅलरी, फ्लॉरेन्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. १९१० मध्ये पियाझा डेला सिग्नोरियामध्ये एक प्रतिकृती ठेवण्यात आली.
नवी प्रतिक्रिया द्या